Wednesday, 22 January 2020

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लता मंगेशकर यांना समर्पित मेणू असलेल्या हृदयनाथ मंगेशकर आणि कुटुंबाचे रेस्टॉरंट 'सर्जा'चे उद्घाटन



संगीत सृष्टीत प्रतिष्टीत मंगेशकर कुटुंब रेस्तरॉ उद्योगात अपरिचित नाही. १९९६ सालामध्ये पुण्याच्या औंध येथे 'सर्जा' ह्या रेस्तरॉ चा शुभारंभ केला होता आणि भव्य यशानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांनी नुकताच पुण्यातील वाकड येथे ह्या 'सर्जा' - रेट्रोरंट अँड बार ची अजून एक शाखा उघडली.  कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ह्या उपाहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी मंगेशकर कुटूंबासमवेत प्रख्यात व्यक्तिमत्व  रूपकुमार राठोड, सुनाली राठोड, रीवा राठोड आणि सलील कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते.


याप्रसंगी उत्साहित पंडित हृदयनाथ मंगेशकर संगीतकारांबद्दलचे व्यंजनाबद्दलच्या आवडीबद्दल व्यक्त होत अभिमानाने “गवये खवैये होते हैं…,” असे म्हणाले.

हया कल्पनेने अत्यंत आनंद व्यक्त करत उपस्थित एक मंगेशकर नातेवाईक म्हणाले, “बाबा स्वत: नियंत्रित खाणारे आहेत, परंतु त्यांना रंगीत आणि स्वादिष्ट व्यंजनाबद्दल समजतात. त्यांना लोकांना खाऊ घालायला आवडते आणि यामुळेच ते उत्तम यजमान आहेत. ” हृदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले,“ “लोकांना आवडते जेवण खाऊ घालणे हि एक अत्यंत आनंददायक भावना आहे. सर्जाला प्रेमळ गोडवा देणारा आहे! ”  


त्यांच्या लोकप्रिय भारतीय, ओरिएंटल आणि चीनी पाककृतींसाठी प्रसिद्ध, वाकडमधील सर्जा गानकोकिळा लतादीदींच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी तयार आहे. वाकड  येथील  'सर्जा ' मध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी खास थाळी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्जा म्हणजे उगवता सूर्या, स्वत: भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे नाव दिले. या रेस्टॉरंटला मंगेशकर कुटुंबाच्या अनेक दुर्मीळ स्मृतींनी प्रशंसकांसाठी सजवले गेले आहे. वाकड येथील प्रमुख विभागामध्ये १२,००० चौरस फूट जागेवर बांधल्या गेलेल्या ४४० जेवणाच्या बसण्याच्या व्यवस्थापनासह या सर्व व्यवस्था पण सर्जा रेस्टॉरंट अँड बार ला परिपूर्ण आणि कौटुंबिक वातावरण बनवतात. इतकेच नाही, तर ज्यांना उत्सव साजरे करायला आवडतात त्यांच्यासाठी एक भव्य मेजवानी देखील आहे.

No comments:

Post a Comment